सूचना
वैकुंठवासी ह.भ.प. तोताराम महाराज गाडेगांवकर लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक मुला मुलींची माहिती संकेतस्थळावर देताना खालील बाबतीत विचार करावा.
1) वै.ह.भ.प. तोताराम महाराज विवाह संस्था या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
2) या संकेतस्थळावर वर, वधू किंवा त्यांचे आई, वडील आपल्या पाल्यांची नोंदणी करू शकतात.
3) वै.ह.भ.प. तोताराम महाराज लेवा पाटीदार समाजाव्यतिरिक्त इतर कोणत्याही जाती-जमातीच्या बांधवांनी या संकेतस्थळावर नोंदणी करू नये.
4) या संकेतस्थळावर विवाहेच्छुक मुलगा/ मुलगीची माहिती समाविष्ट केल्यानंतर तो मुलगा / ती मुलगी आपल्याच समाजातील आहे किंवा कसे, याबाबत मंडळाकडून खातरजमा करण्यात येईल.विवाहेच्छुक उमेदवार आपल्या समाजातील असल्यासच नोंदणी मंजूर करण्यात येईल.
5) नोंदणी मंजूर झाल्यास त्याविषयी व्हाट्सअप किंवा ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
6) उमेदवारांनी खरी व योग्य माहिती द्यावी. उदा. उमेदवाराचे स्वतःचे छायाचित्र देणे, दिशाभूल करणारी माहिती न देणे इत्यादी.
7) आपली नोंदणी स्वीकारल्यानंतर आपले छायाचित्र (फोटो) ज्यांना दिसावे असे आपणास वाटत असेल त्याच उमेदवारास ते छायाचित्र दिसेल, अशी सुविधा करण्यात आलेली आहे.
8) जन्म कुंडली, वेगवेगळी छायाचित्रे, चित्रफिती (व्हिडिओ) लॉगिनद्वारे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
9) नोंदणी झालेल्या उमेदवारास लॉगिनद्वारे योग्य असे स्थळ शोधता येईल व योग्य उमेदवारास भ्रमणध्वनी / भ्रमणध्वनी संदेशाद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल.
10) संकेतस्थळावर उमेदवाराने समाविष्ट केलेली माहिती, लग्न जमल्यास किंवा स्वच्छने काढून टाकता येईल.
11) संकेतस्थळावर नोंदणी करताना किंवा माहिती भरताना काही अडचणी उद्भवल्यास 9823130199 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे विचारणा करावी. मंडळाकडून आणास लवकरात लवकर मार्गदर्शन करण्यात येईल जाईल.